9823004031 n 9850667352

The Shriram Farm

कमी पाण्यात फुलविली थायलंड अप्पल बोरांची रोप वाटिका

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका हा पाणी टंचाईग्रस्त म्हणून ओळखला जातो. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी मिळविण्यासाठी इंदापुरमधील शेतकऱ्याना विशेष परिश्रम सातत्याने घ्यावेच लागतात. याच तालुक्यातील बेडशिंग गावातील सदाशिव राऊत यांनी पाण्याची परिस्थिती लक्ष्यात घेवून दोन एकरातील माळरानावर सफरचंदाच्या आकाराएवाढी बोरे मिळवून देणारी रोपवाटिका व फळबाग ग्रीननेट मध्ये फुलवली आहे.

पाण्याचे नियोजन आणि खत व्यवस्थापन

थायलंड अप्पल बोरांसाठी कमी प्रमाणात पाणी लागते. अप्पल बोरांसाठी ठिबक सिंचनाचा वापर केला गेला आहे त्यामध्ये विशेष पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून पाण्याचा योग्य वापर केला आहे. खतांचा वापर योग्य नसेल तर कोणतेही पिक अधिक उत्पन्न देत नाही. राऊत यांनी अप्पल बोरांसाठी जेविक खतांचा योग्य वापर केला आहे.

लागवडीनंतरचे व्यवस्थापन

थायलंड अप्पल बोरांच्या लागवडीनंतर १ महिन्यातच त्याला फुले लागतात. ती फुले तोडून टाकावी लागतात. ८-९ महिन्यातच उत्पादन सुरु होते. बोरांचे वजन १०० ते १५० ग्राम असते.

उत्पादन
एकरी आठ टन उत्पादन घेवून रोप व फळविक्रीतून त्यांना खर्च वजा जाता ५ लाखांचा नफा अपेक्षित आहे